r/marathi • • 20h ago

चर्चा (Discussion) Is Maharashtra's Cultural Identity and Public Space Being Taken for Granted?

21 Upvotes

Source: https://www.instagram.com/reel/Df2AxecMunM/

This video is from Khadakwasla, Pune district. Large portions of the dam side area appear to have been marked with oil paint, with Chhath Puja inscriptions and boundary like markings.

And this raises an uncomfortable question: What exactly is happening to Maharashtra?

Maharashtra has a distinct linguistic, cultural and historical identity. Yet whenever questions are raised about cultural imposition, the discussion is conveniently turned into accusations of hatred, intolerance and xenophobia.

Why should questioning the growing assertion of outside cultural identities over local spaces automatically be labelled as hatred?

Marathi people are constantly expected to accommodate, adjust and remain silent, while any questioning of such practices is portrayed as an attack on diversity.

This isn't about whether someone should celebrate Chhath Puja. It is about the growing sense that Maharashtra's existing cultural identity and local sentiments can be disregarded whenever politically convenient.

And where are the political parties and leaders who constantly speak about Maharashtra's identity? Why does cultural identity suddenly become a selective issue when electoral calculations enter the picture?

A state cannot celebrate diversity while treating its own linguistic and cultural identity as something that must always take a backseat.

Maharashtra is not culturally identity-less territory. Marathi identity, history, language and traditions deserve recognition and respect too.

At what point does accommodation become a one sided expectation from the local population?


r/marathi • • 21h ago

चर्चा (Discussion) नो वकीलपत्र - साने गुरुजी

2 Upvotes

नो वकीलपत्र
“मेरे राम, मेरे राम, जय जय राम.” लहानगीने हळूच गुणगुणायला सुरुवात केली. आम्ही टेलर स्विफ्टची आणि तिने आमच्या सगळ्या संगीताची चेष्टा करणे हा रोजचा परिपाठ. या पार्श्वभूमीवर हे गुणगुणणे आम्हासाठी जरा वेगळे व स्वागतार्ह होते. आणि याचे कारण अर्थातच नव्या बाजाचे गाणे देणारे ए. आर. रेहमान. नव्या ‘रामायण’ चित्रपटातील त्यांचे ‘जय जय राम’ हे गाणे ती गुणगुणत होती.
गंमत म्हणजे जेवढी लोकांनी रेहमानच्या संगीताची टिंगल केली, तेवढीच नव्या पिढीने या नवीन चित्रपटाची गाणी डोक्यावर घेतली. अकल्पित आणि अर्थातच थोडासा विचार करायला लावणारे!
एखाद्याचे संगीत आवडणे वा न आवडणे हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे. आणि काल रात्रीपर्यंत भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये धडधडीत लोकशाही जिवंत असल्यामुळे आपली स्वतंत्र आवड जपणे आणि जोपासणे हा प्रत्येकाचा अधिकार आहेच. पण रेहमानला दिलीप म्हणणे हा कोणता आगोचरपणा?
अशी निंदा फारच खालच्या पातळीवरील वाटते. आणि अजून वाईट म्हणजे रेहमान मनापासून आवडणाऱ्या मला अशी विधाने थोडीशी क्लेशकारक वाटतात. कारण रेहमानची गाणी ऐकून आम्ही मोठे झालो आणि त्यांच्यावरती खालच्या पातळीवरील टीका मला माझ्या घरच्या लोकांवर केलेली टीका वाटते.
याचा अर्थ रेहमानची सर्व गाणी सर्वांनी एका सुराने गावी का? नाही, तसे नाही. कारण तसे केले तर आपण सगळेच एकसुरी आणि बेजोड नाही का होणार?
जसजसे वय थोडेसे वाढते, तसे आपण शहाणे होत जातो. एकूणच पूर्ण शिक्षणपद्धतीचा निकष आणि भर माणसाला कमीत कमी वेळेत चाळीस वर्षांचा शिक्षित, सुसंस्कारित माणूस बनवणे हाच असावा. शहाणपणाची नेमकी महत्त्वाची पातळी म्हणजे मला कुणाचेच वकीलपत्र घ्यायची गरज नाही, याची जाणीव होणे.
अगोदर रेहमानचे उदाहरण दिले. आता अजून एक साने गुरुजींचे देतो व माझा मुद्दा संपवितो.
साने गुरुजी महान देशभक्त होते. ते बहुधा त्या काळातील भारतातल्या फार थोड्या एम.ए. झालेल्या लोकांपैकी एक होते. त्या काळी सुखनैव नोकरी सोडून, समाजसेवा करून, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन त्यांनी भारताचे अक्षरशः निर्माण केले. आपल्या स्वप्नातला भारत त्यांनी बलिदान देऊन घडविला.
बरे, १९४० च्या दशकात महानायक गांधीजींशी वादविवाद करून, गांधींचा पाठिंबा नसतानाही त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी मोकळे केले. आपले दैवत गांधीजींशी मतभेद स्वीकारून दलितांसाठी एवढे काही करणाऱ्या साने गुरुजींना विपुल ग्रंथसंपदा निर्माण करण्यासाठीही वेळ होता.
श्यामची आई, गीता प्रवचने, गोड गोष्टी आणि इतर बरीच ग्रंथसंपदा त्यांनी तयार केली. मराठी भाषेवर व संस्कृतीवर प्रेम करणारी एक पिढी घडवली.
तर नमनाला घडाभर तेल ओतल्यावरती कुणीतरी साने गुरुजींना फदे म्हणावे, मला वाईट वाटावे व मी गुरुजींसाठी भांडावे, याला खरे तर काहीच अर्थ नाही. कारण सत्तर वर्षे उलटून गेली तरी गुरुजी अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत.
आजही त्यांनी शिकवलेल्या सोहराब आणि रुस्तुमच्या गोष्टीने एका इराणियन माणसाशी तुमचा सुखसंवाद घडून जातो. गुरुजींच्या रसाळ वाणीने देशोदेशींची भिंत कधीच ओलांडलेली असते. व अशा गुरुजींना कोणत्याही वकिलाची गरज नसते. कारण गुरुजी नेहमी प्रातःस्मरणीयच असतात व राहतील.
तेव्हा यापुढे—नो वकीलपत्र!